थाळीनाद, घंटानादावर अजित पवार नाराज, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांनी गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणे टाळण्याची गरज आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत; मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोचवत आहे.

मुंबई : "कोरोना'विरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार. नागरिकांनी आपल्या घरातून घंटानाद, थाळीनाद केले, त्याबद्दल त्यांचेही आभार; परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून एकत्र येऊन हा घंटानाद करणे अपेक्षित नव्हते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांनी गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणे टाळण्याची गरज आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत; मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोचवत आहे. "सर्वांनी रस्त्यावर उतरून गर्दी करणे टाळावे,' असे आवाहनही अजित पवार यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DY CM Ajit Pawar disappointed for people reaction