esakal | शासकीय कामकाजात आता ई-मेल, व्हॉट्‌सऍप ग्राह्य 
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कामकाजात आता ई-मेल, व्हॉट्‌सऍप ग्राह्य 

कामाचा निटपारा लवकर होणार? 
शासनाने कोरोनामुळे शासकीय कामात इ-मेल, वॉटसप ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय कामकाजात सोशल मिडियाचा वापर होणार असल्यामुळे कामाचा निपटारा लवकर होणार का? याबाबत तर्क-वितर्क सुरु आहेत. 

शासकीय कामकाजात आता ई-मेल, व्हॉट्‌सऍप ग्राह्य 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय कामकाजात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात शासकीय कामकाजात ई-मेल व व्हॉट्‌सऍप ग्राह्य धरण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे टपाल आले नसल्याचे कारण देत कागदी घोडे नाचविण्याचे धोरण कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

कागदाच्या माध्यमातूनही कोरोना संसर्ग होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कागदाचा वापर करण्यावर शासनाने मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे शासकीय कामकाजात ई-मेल किंवा व्हॉट्‌सऍपद्वारे दिलेले प्रस्ताव ग्राह्य धरण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. या नव्या निर्णयामुळे कोणत्याही प्रकाराचा निरोप लवकर मिळण्यास मदत होणार आहे. 

शासकीय कार्यलयातील वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल व व्हॉट्‌सऍपद्वारे दिलेले आदेश, सूचना ग्राह्य धराव्या लागणार आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचे अधिकृत वापरातील ई-मेल, व्हॉट्‌सऍप नंबर कार्यालयात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालय प्रमुखांनी त्यावर पाठविलेल्या सूचना, आदेश वाचले, मान्य केले असे गृहीत धरले जाणार आहे. त्यामुळे आता ई-मेल व व्हॉट्‌सऍप ही माध्यमे शासकीय कामकाजाचा भाग झाली आहेत. लॉकडाउनमुळे सध्या अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. अधिकारी-कर्मचारी यांनी ई-मेल व व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून येणाऱ्या प्रस्तावांचा निपटारा करावा. एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या अधिकाऱ्यास मेल केला असेल तर त्याची माहिती लगेच संबंधित अधिकाऱ्यास एसएमएस किंवा व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून देणे बंधनकारक केले आहे. एखादा प्रस्ताव तयार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यास दाखवूनच तो ई-मेलद्वारे फॉरवर्ड करायचा आहे. अशाही सूचना सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 


 

 
 

loading image