ई-फेरफार नोंदी 31 डिसेंबरपूर्वी करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मुंबई - राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंदीचे काम 31 डिसेंबर 2016 पूर्वी पूर्ण करावे; तसेच राज्यातील सर्व तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील जिल्हा वार्षिक योजना व नावीन्यपूर्ण योजनेच्या निधीतून आवश्‍यक तो निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिला. 

संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंद; तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांबाबत आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री पाटील यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, की संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंदीचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तहसीलदार यांनी ज्या अडचणी असतील त्याची माहिती करून घ्यावी व त्याची तपासणी करून त्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. 

ज्या ठिकाणी तलाठ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्‍यकता आहे तेथे तातडीने प्रशिक्षण देण्यात यावे, ज्या तलाठ्यांची डेटा कार्डची रक्कम देणे बाकी असेल ती द्यावी, "एडिट मॉड्युल'मधील आवश्‍यक सुधारणा विषय तज्ज्ञ समितीकडे सादर कराव्यात, असे पाटील यांनी या वेळी सांगितले. त्याचबरोबर तलाठी साझांच्या पुनर्रचनेबाबत सरकार सकारात्मक असून, त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

Web Title: E-manipulated registration needed before 31 December