ईबीसीची सवलत सहा लाखांपर्यंत - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

मुंबई - आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज फ्री प्रतिपूर्ती ही योजना सुरु करण्यात आली आहे. यांच्या नावाने योजना सुरु करण्यात आली असून, सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्य सरकारने आज (गुरुवार) घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईबीसीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना सवलत देण्याची मागणी आहे. यादृष्टीने आम्ही विचार केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, ''सहा लाखांपर्यंत उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्याला अभियांत्रिकीला प्रवेश घेताना सीईटीला 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. मराठा समाजाच्या मोर्चातील सर्वात मोठी मागणी शिक्षण परवडत नाही, अशी होती. कारण, शिक्षणाचे खासगीकरण करून टाकले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने योजना सुरु करण्यात आली आहे. अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी 30 हजार प्रतिवर्ष देण्यात येतील. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये सवलत लागू करण्यात येईल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंयोजना सुरु करण्यात आली. जेवण, राहणे, शिक्षणखर्चासाठी 4 ते 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. खासगी शाळांतील तीन लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. याबरोबरच राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाला 782 कोटी रुपये देण्यात येतील.''

Web Title: EBC facility to be extended till 6 Lakhs, says Devendra Fadnavis