खासदार भावना गवळी ED च्या निशाण्यावर; महिला उत्कर्ष समितीची मुंबईतील संपत्ती जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ; मुंबईतील संपत्ती ED कडून जप्त

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणी (Money Laundering Case) अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ची धडक कारवाई सुरूच आहे. शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) ED च्या निशाण्यावर आहेत. भावना गवळी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, महिला उत्कर्ष समितीची मुंबईतील संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

निकटवर्तीय सईद खान यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. दरम्यान 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे संचालक आहेत.

खासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिश सारडा ( Harish Sarada) यांनी भावना गवळी (Bhavana Gavali) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, भावना गवळी यांनी ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती, असा दावा हरिश सारडा यांनी केला आहे. भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा: मोदी-योगींच्या 'त्या' व्हायरल फोटोचे रहस्य अखेर उलघडले! | Viral Photo

हेही वाचा: उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहणार; संजय राऊत

loading image
go to top