Ravindra Waikar: शिवसेना आमदार रविंद्र वायकरांच्या अडचणी वाढल्या; ED कडून केस दाखल

वायकरांसह इतर आरोपींना ईडीकडून चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.
Ravindra Waikar
Ravindra Waikarsakal media

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) केस दाखल केली आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जोगेश्वरी भागात पालिकेच्या जागेवर एक लक्झरी हॉटेल बांधकाम प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी वायकर यांच्यासह इतर आरोपींना ईडी चौकशीसाठी समन्स देखील पाठवू शकते. (ED has registered case against Shiv Sena UBT leader and MLA Ravindra Waikar)

ईडीनं ५०० कोटी रुपयांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी रविंद्र वायकर यांच्याविरोधात ही केस दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत प्रवर्तन प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) दाखल केला आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ईडीनं रविंद्र वायकरशी संबंधित सर्व दस्ताऐवज आणि जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हे दस्ताऐवज त्यांनी प्राप्त झाले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Ravindra Waikar
Pune Fire News : पुण्याच्या रास्ता पेठेतील विद्यार्थींनींच्या वसतिगृहात आग; शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान जळून खाक

काय आहे प्रकरण?

आमदार रविंद्र वायकर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी मुंबई महापालिकेच्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल बनवण्याची परवानगी मिळवली होती. याद्वारे त्यांनी मुंबई महापालिकेच्या सहाय्यानं ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

या प्रकरणात त्यांची पत्नी मनिषा वायकर, बिझनेस पार्टनर आसू नेहलानाई, राज लालचंदानी आणि प्रथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे शामिल है. रविंद्र वायकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हे राजकीय फायद्यासाठी करण्यात आलेले आरोप आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com