शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या घरावर ईडीचा छापा; सोमय्यांनी केला होता घोटाळ्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Khotkar

शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या घरावर ईडीचा छापा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या जालन्यामधील घरी अंमलबजावणी संचलनालयाने म्हणजेच ईडीने आज सकाळी छापा टाकला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जालनामधील साखर कारखान्याच्या विक्रीमध्ये खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीर आज झालेली ही छापेमारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

हेही वाचा: कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार

शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या घरी आज सकाळी साडेआठ वाजता ईडीचा हा छापा पडला आहे. खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळे जालन्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीतमध्येही ईडीकडून तपासणी सुरु आहे. आज सकाळी साडेआठ वाजताच ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये पोहोचलं. तेंव्हापासून अजूनही तपासणी सुरु आहे. १२ जणांचं पथक या ठिकाणी तपासणी करत आहे. आतमधून दरवाजे बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीय, अशी माहिती आहे.

loading image
go to top