esakal | ED : शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीकडून समन्स; अडचणीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

bhawan gawali

ED : शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीकडून समन्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : शिवसेनेच्या (shivsena) खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भावना गवळींना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये कन्व्हर्ट केल्या प्रकरणी सईद खान (saeed khan) यांना काल (ता.२८) अटक झाली होती. सईद खान हे कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, यामुळे आता भावना गवळींच्या अडचणी वाढू शकतात.

हेही वाचा: भावना गवळींच्या अडचणीत वाढ? सईद खानला अटक

खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार गवळींवर आहेत. मिळालेल्या बातमीनुसार शिवसेना खासदार भावना गवळीना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. यानंतर सोमवारी (ता.४ ऑक्टोबर) हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आला आहे, भावना गवळीच्या ट्रस्टच्या संचालक सईद खानला नुकतीच ईडीने अटक केली होती. ट्रस्टला कंपनी रुपांतर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

'ईडी'ने रिसोड व देगाव येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बीएएमएस कॉलेज तसेच रिसोड तालुक्यातील भावना अॅग्रो लिमिटेड या संस्थांशी संबंधित असलेल्या नऊ ठिकाणांवर छापे टाकले होते.

loading image
go to top