

Trilingual Policy Update
ESakal
मुंबई : त्रिभाषा धोरणासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीने आपला अहवाल आज राज्य सरकारला सादर केला. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिल्या वर्गापासूनच त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात समितीने शिफारस केल्याचे मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांनी सांगितले. जाधव समितीने त्रिभाषेसाठी केवळ हिंदीच नव्हे, तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम लक्षात घेऊन इतर भाषांचे पर्यायही उपलब्ध करण्याबाबत शिफारस केल्याचे सांगण्यात आले.