Education Department: शिक्षण विभागाची धडक कारवाई! १६४ शाळांना टाळे; २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

Education Department Action On Unauthorized School: शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांवर धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. यावेळी १६४ शाळा बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
Education Department Action On Unauthorized School

Education Department Action On Unauthorized School

ESakal

Updated on

मुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात अनधिकृत शाळांवर धडक कारवाईचा बडगा तर उगारला, मात्र कोणतीही ठोस पूर्वतयारी न करता केलेल्या या कारवाईमुळे तब्बल २६ हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्न निर्माण झाला आहे. कारवाईच्या अतिउत्साहात शिक्षण विभागाने तब्बल १६४ शाळांना टाळे ठोकले आणि ७७ शाळांवर गुन्हे दाखल केले. यानंतर उघड्यावर आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पर्यायी शाळांमध्ये सामावून घेण्यात शिक्षण विभागाची पुरती दमछाक झाली असून, हा संपूर्ण प्रकार आता शिक्षण विभागाच्या चांगलाच अंगलट आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com