'जिओ चॅट' ठरणार विद्यार्थ्यांसाठी दुवा; व्हर्च्युअल शिक्षणाच्या दिशेने आणखी एक पाऊल!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

- विद्या परिषदेकडून व्हर्च्युअल शिक्षणासाठी आणखी एक पाऊल
- अभ्यासमाला, ई-साहित्य, अवांतर वाचन असे अजून बरेच काही असणार या व्यासपीठावर

पुणे : ऑनलाईन शिक्षण घेताना बिनचूक आणि वस्तुनिष्ठ असे अस्सल ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आता शिक्षण विभागाने 'जिओ चॅट'वर आपले स्वतंत्र 'चॅनल' खुले केले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ऑनलाईन शिक्षणाची वेगळी वाट निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण अधिकारी, संस्था चालक, शिक्षक यांच्यासाठी देखील याद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून 'जिओ चॅट चॅनल' शिक्षण विभाग आणि शिक्षक, विद्यार्थी यांच्यातील दुवा ठरणार आहे.

रविवारपासून पुणेकरांना दिलासा! लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात 'ही' दुकाने राहणार सुरू!​

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्राचार्य/ मुख्याध्यापक, सर्व शाळांचे शिक्षक, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी, विषय साधन व्यक्ती, मोबाईल टीचर, यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रसारित करण्यात येणारी अभ्यासमाला, विविध प्रशिक्षणे यांची माहिती, संदर्भ साहित्य, शासन निर्णय, ई साहित्य, अवांतर वाचनाची पुस्तके अथवा शिक्षकांसाठी/ शाळांसाठी वेळोवेळी देण्यात येणारी अधिकृत माहिती तत्काळ एका क्लिकवर मिळविण्याची सोय याद्वारे उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी केलं ट्विट अन् वेधले सगळ्यांचेच लक्ष!

यात सहभागी होण्यासाठी हे करा
- आपल्या स्मार्टफोनमध्ये जिओ चॅट हे अॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करा. 
- त्यात आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून अॅपमध्ये नोंदणी करा.
- मग चॅनलमध्ये एससीईआरटी महाराष्ट्र ही वाहिनी शोधा आणि त्याला जॉइन करा.

पुणे व्यापारी महासंघाचे महापालिका आयुक्तांना साकडे; केली 'ही' मागणी!​

'जिओ चॅट चॅनलचे फायदे :
- एकाचवेळी राज्यातील सर्व पालक, शिक्षक, शाळा, अधिकारी यांना ऑडीओ, व्हिडीओ, टेक्स्ट मेसेज मिळण्याची सुविधा
- पालकांना शैक्षणिक साहित्य मिळेल, शालेय शिक्षण विभागाकडून येणारे आदेश एका क्षणात  मोबाईलवर मिळणार.
- विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या अभ्यासमाला, अवांतर वाचनाची पुस्तके व शैक्षणिक सूचना मिळतील.
- कोणावरही अवलंबून न राहता अचूक, वस्तुनिष्ठ माहिती मिळण्याचा स्त्रोत याद्वारे झाले उपलब्ध
- त्या-त्या विषयांच्या शिक्षकांना त्या-त्या विषयाचे साहित्य, माहिती, संशोधने, प्रशिक्षणे, विविध सर्व्हे याची माहिती देण्याची सोय
- जिल्ह्यांना सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांना, शाळांना संदेश द्यावयाचा झाल्यास ती देखील सुविधा उपलब्ध.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"राज्यातील सव्वा दोन कोटी विद्यार्थ्यांपर्यंत, तसेच पालक, अधिकारी, शाळा यांच्यापर्यंत एकाच वेळी बिनचूक व वस्तुनिष्ठ माहिती मोफत स्वरुपात आणि तत्काळ पाठविण्यासाठी जिओ चॅट चॅनल उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील सर्व शिक्षणप्रेमी, पालक, शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या जिओ चॅट चॅनलला जॉईन व्हावे"
- दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education department has launched education channel on Jio Chat for students