तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या शोधात

Technicon
Technicon

पुणे - राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने तंत्र शिक्षण विभाग धास्तावला असून, ही संख्या वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाकडे वळविण्यासाठी आता प्राचार्य आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे लागणार आहे.

राज्यात पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये ४२ शासकीय तंत्रनिकेतन आहेत. प्रत्येक ठिकाणी पंधराहून अधिक एकर जागा, सुसज्ज आणि पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि कार्यशाळा आहेत. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आलेला अध्यापक वर्ग आहे. याबरोबरच शुल्कही वाजवी, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आहेत. तरीही १८ टक्के प्रवेश रिक्त राहतात, अशी चिंता या विभागाला आहे.

उद्‌बोधन वर्ग सक्तीचे
पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून तंत्र शिक्षण विभागाने ‘मिशन- ॲडमिशन २०१९’ मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत प्रत्येक तंत्रनिकेतनमधील प्राचार्य आणि विभागप्रमुखांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांना प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन वा उद्‌बोधन वर्ग घ्यावे लागणार आहेत. यात तंत्र शिक्षकांनाही मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. 

तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ म्हणाले, ‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आमच्याकडे आहे. त्यावर विद्यार्थ्यांना समुपदेशन कार्यशाळेसाठी आमंत्रित करून तंत्र शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. त्यासाठी उद्योगातील तज्ज्ञ बोलावले जाणार आहेत. हे सर्व नियोजन करण्याच्या सूचना तंत्र निकेतनच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com