

School Trip Rules
ESakal
अलिबाग : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शैक्षणिक सहलींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अशा सहलीदरम्यान सुरक्षितता, शिस्त व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. रायगड जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांवर सातत्याने शैक्षणिक सहली येत असतात. या विद्यार्थांना समुद्रात उतरण्यापूर्वी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबतचा सूचना फलक समुद्रकिनाऱ्यावर लावण्यात येणार आहेत.