धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Uniform Civil Code Maharashtra: महाराष्ट्र सरकारने असे संकेत दिले आहेत की, राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी विविध विभाग आणि हितधारकांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Uniform Civil Code Maharashtra

Uniform Civil Code Maharashtra

ESakal

Updated on

धर्मांतरविरोधी कायद्यानंतर महाराष्ट्र सरकार आणखी एक मोठे पाऊल उचलत आहे. उत्तराखंड आणि गुजरातच्या पावलावर पाऊल ठेवत आता महाराष्ट्रातही समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. या महत्त्वाच्या आणि संवेदनशील कायद्यासंदर्भात विविध हितधारकांशी व्यापक सल्लामसलत सुरू असल्याचे राज्य सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेदरम्यान हा मुद्दा समोर आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com