
भरभरुन विश्वास, पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाची राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या होमग्राऊंड परळीत जय्यत तयारी केली आहे. पवारांच्या वाढदिवसाला खास सिनेअभिनेते गोविंदा यांची हजेरी राहणार आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसनिमित्त अभिनेता गोविंदा, धनंजय मुंडे कापणार परळीत ८१ किलोंचा केक
परळी वैजनाथ (जि.बीड) : भरभरुन विश्वास, पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाची राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या होमग्राऊंड परळीत जय्यत तयारी केली आहे. पवारांच्या वाढदिवसाला खास सिनेअभिनेते गोविंदा यांची हजेरी राहणार आहे. धनंजय मुंडे व गोविंदा ८१ किलोचा केक कापून जेष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस साजरा परळीत साजरा होईल. शरद पवार यांचा विश्वास आणि पाठबळामुळेच धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरभरुन मिळाले आहे. मागच्या काळात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद आणि आता महत्वाचे असलेले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या खात्याचे मंत्रीपद त्यांना मिळाले आहे.
मध्यंतरीच भविष्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार या यादीत शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचेही नाव घेतले. दरम्यान, आपल्याला पाठबळ देणाऱ्या नेत्याचा वाढदिवसही धनंजय मुंडे दरवर्षी मोठ्या जल्लोषात आणि सामाजिक उपक्रमाने साजरा करतात. यंदाही वाढदिवसा निमित्त परळी शहर आणि मतदार संघात शरद पवारांचे मोठमोठे फ्लेक्स लागले आहेत. तसेच परळीच्या मोंढा मैदानात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सिनेअभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीत ८१ किलो चा केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मैदानाला विद्युत रोशनाईही करण्यात आली आहे.
एक टक्का भरू न शकणारी महापालिका पाणीपुरवठ्यासाठी ६३३ कोटी कोठून भरणार, अतुल सावेंचा सवाल
गरजू कुटुंबातील पाच हजार महिलांना साडी वाटप, छञपती शिवाजी महाराज चौक व राणी लक्ष्मीबाई टाँवर येथे पेढे वाटप, संजय गांधी निराधार लाभार्थी यांना प्रमाणपञाचे वाटप, यांसह खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या प्रमुख कार्यक्रमाचे लोकनेते गोपिनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. यासाठी
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक
कराड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात बैठक पार पडली. या
बैठकीत उत्सव समिती स्थापन करण्यात आली. या समितीत जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, शिवाजी सिरसाट, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, दत्ता पाटील,
बाजिराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी, नगरसेवक शरद मुंडे, दिपक देशमुख, चंदुलाल बियाणी, भाऊसाहेब कराड, किशोर पारधे, जाबेर खान पठाण, अँड गोविंदराव फड, संचालक माऊली गडदे, माणीक फड, राजेश्वर चव्हाण, विलास मोरे, यांचा समावेश आहे.
संपादन - गणेश पिटेकर