‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ यशोगाथा पाठविण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

जागतिक कर्करोगदिनी म्हणजे ४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ असा महत्त्वाकांक्षी उपक्रम शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’च्या माध्यमातून राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत आपल्या परिचयातील व्यक्तींचे व्यसन सोडविण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी उपक्रमाच्या यशोगाथा पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मुंबई - जागतिक कर्करोगदिनी म्हणजे ४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ असा महत्त्वाकांक्षी उपक्रम शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’च्या माध्यमातून राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत आपल्या परिचयातील व्यक्तींचे व्यसन सोडविण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी उपक्रमाच्या यशोगाथा पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातील व्यक्तीला व्यसनमुक्त करण्यासाठी पत्र लिहिण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या मुख्य कार्य अधिकारी प्राची साठे यांनी केले होते. यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना १५ ऑगस्ट २०१९ पासून शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’ तसेच बजाज इलेक्‍ट्रिकल्स फाउंडेशनच्या माध्यमातून ‘व्यसनमुक्तीसाठी महाराष्ट्रभूषण’ प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. व्यसन सोडविणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तालुका, जिल्हा आणि ज्यांचे व्यसन सोडविले आहे त्यांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, कोणते व्यसन होते, केव्हापासून करीत होते, केव्हा सोडले, कसे सोडले आदी माहिती मार्गदर्शक शिक्षकांनी स्वतःच्या व्हॉट्‌सॲप क्रमांकासोबत सलाम मुंबई फाउंडेशनला १० ऑगस्ट २०१९ पर्यंत ajay.pilankar@salaammumbai.org या ई-मेलवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यसन सोडणारी व्यक्ती कमीत कमी चार महिने व्यसनमुक्त असल्याची खात्री शिक्षकांनी करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ek Patra Vyasanmuktisathi Success story SAAM TV Appeal