Eknath Khadse : पवारांच्या उपस्थितीत खडसे शाहांची भेट होणार; फडणवीस म्हणतात कल्पना नाही

शाहांची भेट झालेली नसून, खडसे आणि शाहांची फोनवर चर्चा झाल्याचे तपासे यांनी स्पष्ट केले.
Eknath Khadase
Eknath Khadase
Updated on

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे शरद पवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत,अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. तसेच खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे तपासे यांनी म्हटले आहे. शाहांची भेट झालेली नसून, खडसे आणि शाहांची फोनवर चर्चा झाल्याचे तपासे यांनी स्पष्ट केले.

Eknath Khadase
Child Pornography : देशातील 20 राज्यांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' अंतर्गत मोठी कारवाई

तपासे म्हणाले की, शाहांच्या भेटीसंदर्भातील माहिती खडसेंनी पवारांना सांगितलेली आहे. तसेच पवारांच्या उपस्थितीतच खडसे आणि शाहांची भेट होणार असल्याचे तपासे यांनी यावेळी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणतात...

तर, दुसरीकडे खडसेंच्या पुन्हा भाजप प्रवेशाबदद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, यावर त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळत याबाबत मला काही माहिती नसल्याचे उत्तर दिले आहे.

Eknath Khadase
Shivaji Park : ही तर शिंदेंची खेळी; BKC वर शिवतीर्थापेक्षा तोबा गर्दी जमवणार?

रक्षा खडसे काय म्हणाल्या?

खडसे आणि शाहांच्या भेटीबाबत भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनीदेखील भाष्य केले आहे. एकनाथ खडसेंसोबत भेट झाली नाही, पण फोनवरुन चर्चा झाल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे. अमित शाहांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे शाहांची भेट होऊ शकली नाही. फोनवरुन काय चर्चा झाली, याबद्दल विचारलं असता रक्षा खडसेंनी उत्तर देणं टाळलं. तसंच खडसे भाजपामध्ये परतणार का? यावर मात्र त्यांनी संदिग्ध उत्तर दिलं. मला त्याबद्दल माहिती नाही. मात्र सध्या तरी मी भाजपात आणि एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत, असं उत्तर रक्षा खडसे यांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Latest Marathi News Live Update
Golden Glory for India: Satara Athlete Sudeshna Helps Team Clinch Top Honors
Love Affair Ends in Bloodshed: Wife, Lover Accused in Engineer’s Murder Plot
NCP leaders sunetra Pawar and Sunil Tatkare 
Marathi News Esakal
www.esakal.com