

Eknath Khadse's Demand for Justice
Sakal
जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पुणे येथील कथित जमीन व्यवहारावरून माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र टीका केली. ‘‘जमीन व्यवहारप्रकरणी मला ज्या पद्धतीने राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते तोच न्याय अजित पवारांनाही लावण्यात यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी, तहसीलदार व दुय्यम निबंधक यांची ‘नार्को’ चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.