esakal | उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

भाजपमध्ये मी नाराज नाही

- शिवसेना प्रवेशाबाबत निर्णय अद्याप नाही 

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी ही भेट होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील सरकार गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारू शकले नाही. हा प्रकल्प सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचा आहे. शरद पवार यांच्याकडे जी मागणी केली तिच मागणी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच जेव्हा या भागाचा दौरा असेल तेव्हा भेट देईन, असेही उद्धव ठाकरे म्हणाल्याचे खडसेंनी सांगितले.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

भाजपमध्ये मी नाराज नाही

भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांबाबत एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपमध्ये मी नाराज नाही. माझी मनधरणी करण्यासाठी तावडे, मुनगंटीवार आले, यात काहीही तथ्य नाही. ते फक्त माझ्या नाराजी दूर करण्यासाठी आलेले नाहीत. आपलं सरकार का आलं नाही याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. 

शिवसेना प्रवेशाबाबत निर्णय अद्याप नाही 

शिवसेनेत कधी प्रवेश करणार याबाबत ते म्हणाले, शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझी जवळीक आहे. मात्र, शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.