Eknath Khadse: 'असंवेदनशील मंत्री अन् सरकारमुळेच शेतकऱ्यांसोबत गोरगरीबांची दिवाळी अंधारात' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadase

Eknath Khadse: 'असंवेदनशील मंत्री अन् सरकारमुळेच शेतकऱ्यांसोबत गोरगरीबांची दिवाळी अंधारात'

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यावरून आता राजकीय नेते विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहे. अशातच एकनाथ खडसे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. असंवेदनशील मंत्री आणि सरकारमुळे शेतकऱ्यांसोबत गोरगरीबांची दिवाळी अंधारात जात आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

असंवेदनशील मंत्री अन् सरकारमुळे शेतकऱ्यांसोबत गोरगरीबांची दिवाळी अंधारात असल्याची टीका एकनाथ खडसेंनी सरकारवर केली आहे. एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलं आहे की, आनंदशिधा वाटपाची शासनाने घोषणा केली, मात्र त्याच्या वाटपातही घोळ सुरु झाला आहे, तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार असल्याचे दिसून येत आहे, अनेक गोरगरीबांना आनंदशिधा मिळाली नाही, एकीकडे लाभ द्यायचा म्हणतात तर दुसरीकडे तो लाभ मिळू नये अशी व्यवस्था सरकारने केलेली दिसते, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा: भाजप सरकार हे हुकूमशाहीचे; एकनाथ खडसे

दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळाला नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले असतानाच कृषीमंत्री म्हणतात कुठे अतिवृष्टी झाली त्यामुळे मंत्र्यांना, सरकारला कुठलीही संवदेनशीलता नाही, आणि यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची, गोरगरीबांची दिवाळी अंधारात असल्याचे सांगत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा: Eknath Khadse Taunting Statement : शिंदे-फडणवीस गटाचे आमदार अस्वस्थ