शिंदे-फडणवीस सरकारचा खडसेंना दुहेरी धक्का; 'त्या' कारभाराची होणार चौकशी

ही कारवाई म्हणजे मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse Sakal

Eknath Khadse Jalgaon Dudh Federation : शिंदे-फडणवसी सरकारने एकनाथ खडसे यांना दुहेरी धक्का देत त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. कारण खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

Eknath Khadse
मुंबईत NCB ची कारवाई; कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त; चौघांना अटक

नगराज पाटील यांनी केली होती तक्रार

जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील मोठ्या गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती. मात्र, गेल्या मविआ सरकारकडून याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने खडसेंना दुहेरी धक्का देत याच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

Eknath Khadse
... तर कर्नाटकात ‘योगी मॉडेल’ लागू करणार : बसवराज बोम्मई

ही कारवाई म्हणजे राजकीय खेळी

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. तसेच दूध संघाच्या कारभारात एक रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नसल्याचे म्हटले आहे. जर काही भ्रष्टाचार झाला असेल तर, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आपण स्वतःच करू असे म्हटले आहे. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करणे आणि चौकशी समिती नियुक्त करण्यामागे मोठे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com