Vidhan Sabha 2019 : महाजन म्हणतात, 'खडसे नाराज नाहीत'

टीम ई-सकाळ
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

- एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजन यांनी केले वक्तव्य.

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. मात्र, यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश नाही. भाजप नेते गिरीश महाजन यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, खडसे नाराज नाहीत. त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. पक्ष कोणताही अन्याय करणार नाही.

तसेच ते पुढे म्हणाले, खडसे नाराज नाहीत. त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. पक्ष कोणताही अन्याय करणार नाही. आज संध्याकाळपर्यंत खडसे यांच्या विषयावर पडदा पडेल, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. अन्य पक्षांच्या संपर्कात असल्याच्या बाबतीत खडसे यांनी स्वतः देखील खंडन केले असल्याने या निवळ अफवा असल्याचे महाजन यांनी म्हटले. 

Vidhan Sabha 2019 : अमित, धीरज देशमुख यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राजकारणाविषयीच्या निर्णयावर विचारले असता ते म्हणाले, अजितदादा तसं करणार नाहीत. या सर्व गोष्टी अफवा आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेसची अवस्था वाईट आहे. 40 च्या आत त्यांच्या जागा येतील. 40 आकडा गाठणे त्यांना शक्य नाही. त्यांना 30 च्या आसपास जागा मिळतील.

Vidhan Sabha 2019 : भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंचे नाव नाहीच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse is not Nervous says Girish Mahajan Maharashtra Vidhan Sabha 2019