उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

पंकजा मुंडे यांच्याशी परिवारिक चर्चा झाली. गोपीनाथ मुंडे त्यावेळी नाराज होते त्याबाबत चर्चा झाली. गोपीनाथ गडावर भाजपचे अनेक नेते येणार आहेत. गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे नेते होते, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक जण येतील.

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे

मुंबई : भाजपमध्ये आम्ही आजही आहोत, पक्षासाठी काम केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (मंगळवार) मी बैठक घेणार असून, या बैठकीनंतर निर्णय सांगेन, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 12 डिसेंबरला असलेल्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पंकजा मुंडे यांच्याशी भेट घेतल्यानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही : बाळासाहेब थोरात

खडसे म्हणाले, की पंकजा मुंडे यांच्याशी परिवारिक चर्चा झाली. गोपीनाथ मुंडे त्यावेळी नाराज होते त्याबाबत चर्चा झाली. गोपीनाथ गडावर भाजपचे अनेक नेते येणार आहेत. गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे नेते होते, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक जण येतील. 12 तारखेच्या कार्यक्रमाबद्दल मी पंकजा मुंडेंशी चर्चा केली. गोपीनाथ गडावर राजकीय चर्चा नाही. 

भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे