खडसे म्हणतात, मला, तावडेंना आणि बावनकुळेंना बाजूला सारले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

देवेंद्र फडणवीस यांनी मला विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना बाजूला सारले. आम्हाला बरोबर घेतले असते तर 20 ते 25 जागा वाढल्या असत्या, असा घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी मला विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना बाजूला सारले. आम्हाला बरोबर घेतले असते तर 20 ते 25 जागा वाढल्या असत्या, असा घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकासआघाडीची बैठक

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असून, भाजपला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. अजित पवार यांच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या तीन दिवसांत राजीनामा द्यावा लागला होता. आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून भाजप नेत्यांवरच टीका करण्यात येत आहे. 

भाजपने गमावले अजून एक राज्य, आता हातात राहिले एवढेच

आमच्यावर ज्यांनी आरोप केले फडणवीसांनी त्यांच्यासोबत शपथ घेतली. सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले. यंदाही महायुतीला पाहून लोकांना मतदान केले. मात्र, दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदावरून एकमत न झाल्याने भाजप-शिवसेना वेगवेगळी झाली. त्यानंतर गेल्या महिनाभरात झालेले आपण पाहिले. पक्ष कधी चुकत नसतो, पण पक्षाची जबाबदारी असलेले चुकत असतात. माझ्यासह तावडे, बावनकुळे, मेहता यांना बरोबर घेतले असते तर जागा वाढल्या असत्या. हेतूपरस्पर आम्हाला वेगळे ठेवले. मी गेल्या 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse Talking politics