esakal | शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकासआघाडीची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Silver-Oak

आज सकाळपासून विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी पार पडला. या शपथविधीला सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सर्व आमदारांचे विधानभवनात स्वागत केले. उद्या मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी आज उद्या कोण-कोण शपथ घेणार याविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकासआघाडीची बैठक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीची बैठक आज (बुधवार) दुपारी 12 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर ही बैठक होत आहे.

भाजपने गमावले अजून एक राज्य, आता हातात राहिले एवढेच

आज सकाळपासून विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी पार पडला. या शपथविधीला सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सर्व आमदारांचे विधानभवनात स्वागत केले. उद्या मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी आज उद्या कोण-कोण शपथ घेणार याविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

दुपारी बारा वाजता सिल्वर ओकवर बैठक होत असून, शेतकऱ्यांसदर्भात महाविकासआघाडी मोठा निर्णय घेणार? शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या तयारीत महाविकासआघाडी असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भातही यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

अन् फोन आल्याने सुप्रिया सुळे विधानभवनातून पळतच गेल्या, का?

तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. एक डिसेंबरला शिवाजी पार्कवर उद्धव यांच्या नेतृत्वातील सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची घोषणाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वेळी केली. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने उद्याच सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर राष्ट्रावादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे बहुमतापर्यंत पोचू शकणार नसल्याची जाणीव होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीस सरकारचा कारभार चार दिवसांत उरकला. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या व नवे सरकार अस्तित्वात येण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या.