'CM Shinde 15 आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते'; दाव्यानंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

'CM Shinde 15 आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते'; दाव्यानंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने फडणवीस सरकारच्या काळात आमच्याकडे प्रस्ताव दिला होता. शिवसेनेचे जे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते त्यामध्ये एकनाथ शिंदे हे पण होते असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत १५ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा शिवेसनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यानंतर शिंदे गटाने आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"शिंदे साहेब उद्धव ठाकरे यांच्या सांगण्याशिवाय एकनाथ शिंदे काँग्रेसकडे प्रस्ताव घेऊन जाऊ शकत नव्हते. पण सध्या ज्या काही चर्चा होत आहेत त्याविषयी आम्हाला माहिती नाही" असं मत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्यक्त केलं आहे. पण असं साहस एकनाथ शिंदे कधी करणार नाहीत, लोकं वाटेल ते बोलतात, याविषयी मुख्यमंत्र्यांनाच विचारले पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: Kapil Patil : भाजप केंद्रीय मंत्र्याच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट; पैशाची केली मागणी

"फडणवीस सरकारच्या काळात सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते" असा गौप्यस्फोट चव्हाणांनी केला होता. त्यालाच दुजोरा देत चंद्रकांत खैरे यांनी अजून वेगळा गौप्यस्फोट केला असून "एकनाथ शिंदे १५ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यावेळी ते पृथ्वीराज चव्हाणांची मदत घेत होते पण ते शक्य झालं नाही. पण नंतर ते शिवसेनेच्या नेत्यांच्या निदर्शनास आलं. आज ते आम्हाला नावं ठेवतात पण त्यांनी सर्वांत आधी गद्दारी करणार होते" असं ते म्हणाले आहे.

चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंचे ज्योतिष - गोगावले

चंद्रकांत खैरे हे सध्या उद्धव ठाकरे यांचे ज्योतिष आहेत. ते चांगल्या प्रकारे भविष्य सांगतात. त्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही, त्यांनी आता संजय राऊतांची जागा घ्यायला चालू केली आहे असा टोला गोगावले यांनी खैरे यांना लावला आहे.