

amit shah eknath shinde
esakal
Shivsena Ministers: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेत तूतू-मैंमैं सुरु आहे. त्यातच मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली. राज्यात सुरु असलेल्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेना नाराज असल्याचं दिसून येतंय. या घटनेनंतर बुधवारी एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय.