बाळासाहेबांच्या काळातील योजना राबवणार; मनोहर जोशींच्या भेटीनंतर शिंदेंची घोषणा | Eknath Shinde and Manohar Joshi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde

बाळासाहेबांच्या काळातील योजना राबवणार; मनोहर जोशींच्या भेटीनंतर शिंदेंची घोषणा

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी जोशी यांच्या सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या योजना आम्ही राबवणार असल्याची घोषणा केली. आज त्यांचं मार्गदर्शन मिळाल्याचं शिंदे यांनी म्हटलं. (Eknath Shinde news in Marathi)

हेही वाचा: ओबीसींच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करू; फडणवीसांचं स्पष्टीकरण

तत्कालीन युती सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या योजना राबवू. तसेच राज्याच्या भल्यासाठी जेकाही असेल ते करण्यात येईल, असही शिंदे यांनी म्हटलं.

मनोहर जोशी हे शिवसेनेचे प्रमुख नेते होते. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच कामाला येईल. आज जोशी यांनी मला ६० योजनांचे एक पुस्तक दिले. या योजनांची युती सरकारच्या काळात घोषणा केली होती. त्यांनी या योजना राबविण्याचा सल्ला दिला. या सर्व योजना चांगल्या असून बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंतच पोहोचविल्या पाहिजे, अशी भावना जोशी यांनी व्यक्त केली. आमचं युतीच सरकार त्यांच्या त्या योजना पूर्ण करेल, असही शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा: संजय राऊतांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; केली ‘ही’ मागणी

मुख्यमंत्री शिंदे पुढं म्हणाले की, या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नव्हतं. याचा राजकीय अर्थ काढू नये. लिलाधार डाके किंवा मनोहर जोशी असो या नेत्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं होतं की, सर्व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेऊ. या लोकांनी शिवसेना वाढविण्याचं काम केलं. त्यामुळे मी सर्वांची भेट घेत आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं. मनोहर जोशी भाजप-शिवसेना युतीच्या काळातील शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते.

Web Title: Eknath Shinde And Manohar Joshi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Eknath Shinde