Eknath Shinde : दावोस दौऱ्यानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मोदींची... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde News

Eknath Shinde : दावोस दौऱ्यानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मोदींची...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्विझर्लंड येथीलल दावोस दौरा आटोपून पुन्हा मुंबईत दाखल झाले आहेत.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

हेही वाचा: Bus Accident : विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात; दोन ठार ८ गंभीर

ते म्हणाले की, वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये अनेक करार झाल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले. दावोस दौऱ्याबाबत आपण समाधानी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या दौऱ्यादरम्यान राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे करार करण्यात आल्याचे शिंदे म्हणाले. मोदींची वर्ल्ड इकोनॉमिक फोरमवर छाप पाहायला मिळाल्याचेही शिंदे म्हणाले.

हा दौरा राज्यासाठी फायद्याचा ठरला असून, या दौऱ्यामध्ये विविध देशांच्या नेत्यांनी महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. ही राज्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

हेही वाचा: Raj Thackeray : दंड ठोठावत परळी न्यायालयाकडून राज ठाकरेंबाबत मोठा निर्णय

विविध देशांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छा व्यक्त करत यासाठी आवश्यक करार केले आहेत.

हे सर्व करार प्रत्यक्षात आणले जाणार असून, याचा फायदा राज्यसोबत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासाठी होईल असा, विश्वास शिंदेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.