Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे ‘मुख्य नेता’पद आधारहीन; उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात दावा

Shiv Sena UBT Questions Eknath Shinde’s ‘Chief Leader’ Position: शिंदे मुख्य नेता, शिवसेना यूबीटी, सर्वोच्च न्यायालय शिवसेना यूबीटीने एकनाथ शिंदेंच्या ‘मुख्य नेता’पदाच्या निवडीवर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केला.
Eknath Shinde

Eknath Shinde

esakal

Updated on

नवी दिल्ली: ‘‘शिवसेना पक्षाच्या १९९९ च्या घटनेत ‘मुख्य नेता’ असा उल्लेख नाही. पक्षाच्या घटनेत मुख्य नेता नव्हे तर ‘पक्ष प्रमुख’ असा उल्लेख आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे स्वत:ला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलतात,’’ असा सवाल शिवसेना ‘यूबीटी’च्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेतील मुख्य नेतेपदाच्या निवडीला तसेच निवडणूक आयोगाने घेतलेल्या काही निर्णयांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com