Police : तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल; पोलीस कर्मचारी निलंबित

तमाशात चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Police personnel suspended for dancing in Tamasha Jalgaon
Police personnel suspended for dancing in Tamasha Jalgaonesakal
Summary

तमाशात चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Jalgaon News : गेल्या काही दिवसापूर्वी मराठा समाजाबद्दल (Maratha Community) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता अशातच तमाशात नाचणं एका पोलिसाच्या अंगाशी आलं असून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एका सहायक फौजदाराला निलंबित केलं आहे.

भटू वीरभान नेरकर असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या (Jalgaon Taluka Police Station) आणखी एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या कारवाईमुळं जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Police personnel suspended for dancing in Tamasha Jalgaon
अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच 7 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न? विद्यापीठाकडून मोठा खुलासा

तमाशात पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा कर्मचारी केवळ नाचत नाही, तर पैसे ओवाळून टाकत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. जळगावातील हा प्रकार असून यामुळं पोलीस दलाची नाचक्की होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Police personnel suspended for dancing in Tamasha Jalgaon
Goa Politics : राजकीय समीकरण बदलणार; 'गोवा फॉरवर्ड'चे लवकरच काँग्रेसमध्ये विलिनीकरण!

नेमकं काय प्रकरण?

गेल्या महिन्यात निवृत्ती नगरात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (२२, रा. आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. दरम्यान, या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याने गावात तमाशाचं आयोजन केलं होतं. तिथं भटू नेरकरसह एका अन्य कर्मचाऱ्यानं हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळं नेरकरला निलंबित करण्यात आलं तर दुसऱ्याचा या प्रकरणात नेमका काय सहभाग आहे?, त्याची चौकशी सुरु असून तथ्य आढळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेंनी माध्यमांशी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com