Shivsena: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाची तयारी सुरू; लोकसभेच्या 'इतक्या' जागा लढवणार; ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं?

शिंदे गटाचा २२ मतदारसंघांवर दावा; लोकसभेची तयारी सुरू, आढावा बैठकीत निर्णय
Shivsena
ShivsenaEsakal
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (शिंदे गट) तयारीला लोकसभा निवडणुकीला वेग आला आहे. २०१९ च्या लोकसभेत लढविलेल्या २२ जागांवर शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवला आहे. आगामी निवडणुकीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नजरेसमोर ठेवूनच त्यानुसार प्रचाराची तयारी करण्याबाबत ठरविण्यात आले आहे.

शिंदे गटाकडून या २२ जागांचा सोमवारी आढावा घेण्यात आला. शिवसेनेने मागील निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी २२ लोकसभा जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १८ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतील बंडानंतर १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. या खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.

Shivsena
Same Sex Marriage : समलिंगी विवाहावर आज होणार निर्णय, नेमकं काय आहे प्रकरण?

प्रत्येक मंत्र्यावर दोन ते तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाणार आहे, अशी माहिती आढावा बैठकीनंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.त्याचबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजना प्रत्येक मतदारसंघात कशा प्रकारे राबविता येतील, याच्या सूचना खासदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्या, असेही शेवाळे यांनी सांगितले.

Shivsena
Shivsena Case: सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिलेली मुदत आज संपणार; नार्वेकर नवे वेळापत्रक सादर करणार?

लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. लोकसभेच्या २२ मतदारसंघांत शिवसेनेचा खासदार निवडून कसा येईल, यावर भर दिला जाणार आहे. विद्यमान १३ खासदारांचा निर्णय झाला आहे. उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील.

- राहुल शेवाळे, खासदार, शिंदे गट

Shivsena
Accident News: इच्छा अधुरीच...मुलाची भेट होण्याआधीच ट्रकने महिलेला चिरडलं! संभाजीनगर येथील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com