'शहाजी पाटील, सत्तार, शिंदे, फडणवीस...' अजित पवारांनी एकाच भाषणात 4 जणांना सुनावलं

भाजपा शिंदे सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मोठ्या संख्येने प्राप्त करत विजय मिळवला आहे
ajit pawar
ajit pawar esakal

मुंबई : भाजपा शिंदे सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मोठ्या संख्येने प्राप्त करत विजय मिळवला आहे. यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी शहाजी पाटील, अब्दुल सत्तार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना एकाच भाषणात चांगलेच खडेबोल सुनावले. 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. मात्र, असे असतानादेखील सारखं सारखं शिवसैनिक का सांगावं लागत? याचे आत्मचिंतन करणे गरजेचं आहे. भाजपा शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहातील भाषणादरम्यान ते बोलत होते. (Ajit Pawar Speech In Vidhansabha)

ajit pawar
अजित पवारांची विरोधी पक्ष नेते म्हणूून निवड; सभागृहात रंगणार जुलगबंदी

अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 30 जून शपथ घेतली आज वेगळी भूमिका आहे. लोकशाहीत हे चालत. सत्ता येते जाते. देवेंद्रजी कळलं नाही एकनाथ राव समर्थन करत होता. मग एकनाथ राव शिंदे तुमच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा रस्ते विकास खात का दिल? नेता मोठ असला की खात मोठ देतात जर आजचे मुख्यमंत्री एकनाथ राव तेवढे गुण होते तर फक्त एक छोटे रस्ते विकास महामंडळ जनतेशी सबंध नव्हता. जनतेशी सबंधित एखादे खाते त्यांना दिले नाही त्यामुळे महाराष्ट्र विचार करेल असेही अजित पवार म्हणाले.

ajit pawar
बंडखोरांचे पुतळे जाळणारे संतोष बांगर शिंदेंच्या बसमध्ये, सेनेचा आणखी एक आमदार फुटला

आज अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. अकरा तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे ते निर्णय देतील मग तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घ्यायचे कारण होते का? असा प्रश्नदेखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थिते केला. यावेळी अजित पवारांनी राज्यपाल आयुक्त आमदारांच्या निवडीवरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आम्ही 12 आमदारांच्या निवडीबाबत अनेकदा राज्यपालांना भेटलो परंतु, त्यावर आता जेवढा त्वरीत निर्णय घेण्यात आला तेवढा झटपच निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, आता राज्यपाल अॅक्शन मोडवर आले आहेत.

ajit pawar
संजय राऊतांना कोर्टाचा दणका; वॉरंट धाडत हजर राहण्याचे आदेश

पटोलेंनी राजीनामा दिला त्यानंतर सव्वा वर्ष निवडणूक घेतली नाही. तारीख द्या सांगितल अध्यक्ष निवड लावली नाहीत असे झाले नाही. आता मात्र लगेच निवड लावली. राज्यात इतकं काही घडलं की, उद्धव ठाकरेंवर अविश्वास टाकून बाजूला त्यांना पद सोडावे लागले. या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये काय संदेश गेला असेल. विधानपरिषदेच्या निकालानंतर बंडखोरी करून व्हाया सुरत गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांना बारा तेरा दिवसात आमदार हयातीत इतकं फिरायला मिळालं नसेल तेवढं फिरायला मिळालं आहे. यावेळी अजित पवारांनी शाहजी बापू यांच्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओक्के अस म्हणत हशा पिकवला. मात्र, ही मोठी लोकं कधी एकत्र येतील कळणार नाही असा मोलाचा सल्ला भाजपचं नाव न घेता दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com