अजित पवारांची विरोधी पक्ष नेते म्हणूून निवड; सभागृहात रंगणार जुलगबंदी

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे.
Ajit Pawar News | Ajit Pawar Appointed as  Opposition Leader
Ajit Pawar News | Ajit Pawar Appointed as Opposition LeaderSakal

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक (Floor Test) ठरावही जिंकला आहे. त्यामुळे आता मविआकडून (Mahavikas Aghadi) विरोधी पक्ष (Opposition Leader) नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे येतून पुढील काळात अजित पवार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची जागा घेणार असून, येथून पुढे सभागृहात शिंदे सरकार विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) यांची जुगलबंदी दिसून येणार आहे. (Ajit Pawar Latest News In Marathi)

Ajit Pawar News | Ajit Pawar Appointed as  Opposition Leader
भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प: फडणवीसांनी मानले सीतारामन,मोदींचे आभार

दरम्यान, बहुमत सिद्ध केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताचा प्रस्ताव मंजुरीसाठी बाहेरून मदत करणाऱ्यांचे आभार मानले. फडणवीस म्हणाले की, सभागृहाने शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवला आहे. या बहुमत चाचणीमध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप उपस्थित नव्हते. मतमोजणीसाठी सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने या आमदारांना सभागृहात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. मात्र, हाच मुद्दा हेरत फडणवीसांनी विश्वास दर्शक ठरावाला बाहेरून पाठिंबा दिल्याचे सांगत त्यांचे आभार मानले. (Eknath Shinde Floor Test News In Marathi)

Ajit Pawar News | Ajit Pawar Appointed as  Opposition Leader
Maharashtra Floor Test LIVE: "ED म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र"; फडणवीसांची फटकेबाजी

सभागृहात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मी पुन्हा येईल या त्यांच्या वाक्याचा संदर्भ देत विरोधकांचे चांगलेच कान टोचले. ते म्हणाले की, मी पुन्हा येईन, असं म्हणालो, तेव्हा अनेकांनी माझी थट्टा केली. पण आता मी पुन्हा आलोय आणि यांना सोबत घेऊन आलोय, असंही देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंनी माणसं जोडावीत, कोणत्याही कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करू नये. कोणाचं आमंत्रण आलं, तर रात्री अपरात्री का होईना पण तिथे उपस्थिती दर्शवायचीच, असा सल्ला एकनाथ शिंदेंना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com