शिंदे अन् बंडखोर आमदारांनी रेडिसन ब्लू हॉटेलचे बिल भरले, वाचा किती आला खर्च

बंडखोरी केल्यानंतर या सर्व आमदारांच्या वास्तव्यासाठी गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलची निवड करण्यात आली होती.
Eknath Shinde
Eknath Shinde Sakal

गुवाहाटी : विधानपरिषदेच्या निकालानंतर व्हाया सुरत गुवाहाटी येथे मुक्कामी गेलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी रेडिसन ब्लू (Radisson Blu) या हॉटलचे संपूर्ण बिल दिल्याचं सांगितले जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्काम होते. बुधवारी चेक आऊट करताच या सर्वांनी हॉटेलचे बिलं (Radisson Blu Hotel Bill) दिल्याचं एका हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आठ दिवसांचे बिल नेमकं किती आले याचा आकडा या कर्मचाऱ्याने सांगण्यास नकार दिला. असे असले तरी, ही रक्कम 68 ते 70 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (Eknath Shinde Radisson blu)

Eknath Shinde
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आनंद दिघेंच्या पुतण्याने केली मोठी मागणी

सर्व 70 रूम करण्यात आल्या होत्या बुक

बंडखोरी केल्यानंतर या सर्व आमदारांच्या वास्तव्यासाठी गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलची निवड करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, हॉटेल बुकिंगवेळी येथे असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजेच 70 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. तसेच हॉटेलचे रेस्टॉरंट, बॅक्वेटसह इतर सुविधा बाहेरील लोकांसाठी 22 ते 29 जून या कालावधीत संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील सर्व आमदार सामान्य पाहुण्याप्रमाणे याठिकाणी थांबले होते असेही हॉटेलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच या सर्वांनी हॉटेल सोडण्यापूर्वीच संपूर्ण बिल भरल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले.

Eknath Shinde
फडणवीसांसाठी राज ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले, ''तुम्ही तुमचं कर्तृत्व...''

जेवणाचे बिल अंदाजे 22 लाख

या हॉटेलमध्ये आमदार ज्या रूम्समध्ये थांबले होते त्या सुपीरियर आणि डिलक्स श्रेणीतील होत्या. रेडिसन ब्लूच्या वेबसाइटनुसार, गुवाहाटी येथील या हॉटेलच्या खोल्यांचे भाडे डायनामिक असून यामध्ये जवळजवळ दररोज बदल केला जातो. सामान्यत: सुपीरियर रूमचे भाडे सुमारे 7500 च्या आसपास तर, डिलक्स रुमचे भाडं दररोज 8500 रुपये असते असे सूत्रांनी सांगितले. या हॉटेलमध्ये काही डिलक्स आणि सुमारे 55 सुपर डिलक्स रूम आहेत. या सर्व रुमचे आमदारांच्या आठ दिवासांचे भाडे डिस्काउंट आणि टॅक्स मिळून अंदाजे 68 लाख तर जेवणाचे बिल सुमारे 22 लाख रुपये आल्याचे समजते.

Eknath Shinde
शिंदेच्या आग्रहानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री - चंद्रकात पाटील

इतर कोणतीही सशुल्क सेवा नाही

हॉटेल कर्मचार्‍यांना विचारण्यात आले की, येथे राहणाऱ्या आमदारांनी इतर कोणत्याही सशुल्क सेवेचा लाभ घेतला का? यावर कर्मचार्‍याने सांगितले की, आमदारांनी केवळ कॉम्पिमेंट्री सुविधांचाच लाभ घेतला. याशिवाय स्पा किंवा अन्य कोणत्याही सेवेचा लाभ घेतला नाही. 22 जून रोजी सकाळी मुंबईपासून सुमारे 2700 किमी अंतरावर असलेल्या या हॉटेलात सर्व आमदारांनी एन्ट्री घेतली होती. त्यानंतर 29 जूर रोजी बुधवारी हे लोक हॉटेलमधून बाहेर पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com