

Eknath Shinde Sharad Pawar milind narvekar maharashtra politics
esakal
Milind Narvekar Eknath Shinde handshake : राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी सायंकाळी विधान भवनात राजकीय हालचालींना वेग आला. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडली. दरम्यान, आजारी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तातडीने विधान भवनात दाखल झाले. याचवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याशी शिंदे यांनी केलेले हस्तांदोलनही चर्चेचा विषय ठरला आहे.