
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? CM एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
मुंबई - राज्याच्या दृष्टीने आज सर्वोच्च न्यायालयात दोन महत्त्वपूर्ण बाबींवर सुनावणी होणार होती. त्यामध्ये राज्याच्या सत्तांतरणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता. सर्वोच्च न्यायालयाने आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावर महाराष्ट्राला दिलासा दिला. तर एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार संदर्भातील याचिकांवरील सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. (Eknath Shinde News in Marathi)
हेही वाचा: "काय नाना…तुम्ही पण झाडी डोंगार हाटेलात?" चित्रा वाघ यांच ट्विट
ओबीसी आरक्षणावर शिंदे म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी आमच्या सरकारचा पायगुण चांगला आहे. त्यामुळे प्रश्न मार्गी लागला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून बांठिया आयोगाच्या अडचणी दूर केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाचे आपण आभारी असून ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्यांचा विजय झाला आहे. ओबीसी आरक्षणाचं श्रेय आम्हाला घ्यायचं नसून याचं श्रेय ओबीसींसाठी लढा देणाऱ्याचं असल्याच शिंदे यांनी नमूद केलं.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सरकार अवैध असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमचं सरकार वैध असून लोकशाहीत बहुमताला आणि आकड्यांना महत्त्व आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी न्यायालयाची काहीही अडचण नाही.
Web Title: Eknath Shinde Reaction On Cabinet Expansion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..