.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Sakal
नवी दिल्ली : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेला आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी फेटाळून लावला. "मी कोणालाही ५०० कोटी रुपये दिलेले नाहीत किंवा कोणाकडून घेतलेलेही नाहीत. जरांगे कोणत्या आधारावर बोलत आहेत? बोलण्यापूर्वी त्यांनी तथ्यांची खातरजमा करायला हवी होती," असे शिंदे यांनी नवी दिल्ली येथे सांगितले. जरांगे यांनी संबंधित यंत्रणांकडे पुरावे सादर करावेत, म्हणजे सत्य समोर येईल, असे आवाहनही शिंदे यांनी केले.