एकनाथ शिंदे म्हणाले, चित्र स्पष्ट आहे, कोणालाही काही सांगण्याची गरज नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde said, we will win in the assembly

शिंदे म्हणाले, "चित्र स्पष्ट आहे, कोणालाही काही सांगण्याची गरज नाही"

मुंबई : आमच्याकडे मोठ्या संख्येने आमदार आहेत. अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहेत. आम्ही गुवाहाटीवरून गोव्याला पोहोचलो आहोत. येथून मुंबईसाठी निघणार आहोत. उद्या बहुमत चाचणी झाल्यास आम्हीच जिंकू. चित्र स्पष्ट आहे. कोणत्याही ज्योतिषाला काहीही सांगण्याची गरज नाही, असे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. (Eknath Shinde said, we will win in the assembly)

सुप्रीम कोर्टात बहुमत चाचणीवर सुनावणी झाली आहे. रात्री नऊ वाजता सुनावणीवर निर्णय येणार आहे. काय निर्णय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आमचेही लक्ष लागले आहे. उद्या बहुमत चाचणी झाल्यास आम्ही सर्व आमदार जाऊ आणि मतदान करू. मात्र, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्याशिवाय पुढचे काहीही ठरवता येणार नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा: न्यायालय रामशास्त्री बाण्याने वागले तर... संजय राऊतांचं वादग्रस्त विधान

सरकार कधी स्थापन होणार, काय होणार याबाबत आताच काही बोलता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा (supreme court) निर्णय यायचा आहे. आम्ही नेहमीच न्यायालयाच्या निकालाचा आदर केला आहे आणि यापुढेही करूच. आमच्यासोबत आमदार आहेत. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे. कोणत्याही ज्योतिषाला काहीही सांगण्याची गरज नाही. आम्ही जिंकू असा विश्वास आहे, असेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. बहुमत सिद्ध करण्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. अशात गुवाहाटीतून आमदार मुंबईत येणार आहे. उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. मात्र, कोर्टाचा निर्णय यायचा आहे. निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन-तीन दिवसांत राज्यात काय काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Eknath Shinde Said We Will Win In The Assembly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..