Eknath Shinde | ठाकरे सरकार लवकरच पडणार? एकनाथ शिंदेंच्या कृतीचे परिणाम काय होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

ठाकरे सरकार लवकरच पडणार? एकनाथ शिंदेंच्या कृतीचे परिणाम काय होणार?

विधान परिषदेची निवडणूक पार पडताच शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्यासोबत आता अनेक शिवसेना आमदार, काही मंत्री हेही नॉट रिचेबल झाले आहेत. शिंदेंसह शिवसेना आमदार आता गुजरातमधल्या सूरत इथं असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं असून ठाकरे सरकारच्या खुर्चीला हादरा बसण्याची शक्यता आहे. नक्की काय होतील शिंदेंच्या या खेळीचे परिणाम? (Will Uddhav thackeray government in Maharashtra fall?)

हेही वाचा: Eknath Shinde LIVE : "...नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता", राणेंचं ट्वीट चर्चेत

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या (Shivsena leader Eknath Shinde) या कृतीमुळे राज्य सरकारला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल विधान परिषदेची निवडणूक झाली आणि वोटिंग प्रमाण खूप झाल्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाल्यासारखी स्थिती आहे. जे काही आमदार शिवसेनेचे नॉटरिचेबल आहेत त्यात दोन शक्यता आहेत. पहिली म्हणजे शिवसेनेसोबतच वाटाघाटी करू शकतात किंवा ते बाहेर पडले तर ते अपात्र ठरू शकतात. यामुळे जर तीन पक्षाचं सरकार गेलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांच्यावर अविश्वास ठराव येऊ शकतो, असा अंदाज बापट यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Not reachable एकनाथ शिंदेंमुळे सत्तेच्या खुर्चीला धक्का? कोण आहेत शिंदे?

यानंतर राज्यपाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांच्याशी बोलून मुख्यमंत्रीपदासाठी विचारणा करू शकतात. जर ते हो म्हणाले तर ते मुख्यमंत्री होतील, नाही तर निवडणुका घ्याव्या लागतील. यातून काय निर्णय घ्यायचा हे भाजपाचे श्रेष्ठ नेते ठरवतील. विधानसभेत अविश्वास ठराव मंजूर झाला तर घटनेनुसार राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना बोलवण्याचा अधिकार असतो.

Web Title: Eknath Shinde Shivsena Leader Uddhav Thackeray Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top