"शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही" : CM एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले असून उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
eknath shinde uddhav thackeray
eknath shinde uddhav thackeraySakal

मुंबई : महाराष्ट्रात शिंदे (CM Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाले असून उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी केले होते. पण आमच्याकडे बहुमत आहे, दोन तृतियांश बहुमत आमच्याकडे असल्याने आम्हाला शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

(Maharashtra Politics)

उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला आहे. तर शिंदे आणि फडणवीस सरकारने राहुल नार्वेकर यांचा अर्ज भरला आहे. यासाठी उद्या मुंबईत मतदान होणार आहे. दरम्यान मतदानासाठी शिवसेनेने आपल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आमच्याकडे दोन तृतियांश आमदार आहेत. बहुमत असल्यामुळे शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही." असं शिंदे यांनी सांगितलं.

eknath shinde uddhav thackeray
पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी असा आहे शिंदे फडणवीस सरकारचा प्लॅन

दरम्यान एकनाथ शिंदे हे सध्या गोव्यातील बंडखोर आमदारांना मुंबईत आणण्यासाठी गोव्यात गेले आहेत. आमदारांना घेऊन ते काही वेळात मुंबईत पोहोचणार आहेत. तब्बल ११ दिवसांनी हे आमदार महाराष्ट्रात येणार असून मुंबईत आल्यावर शिंदे गटातील आमदारांची आणि भाजपच्या आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे तर सोमवारी नव्या सरकारला बहुमत चाचणीसाठी सामोरं जावं लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्र देण्यात आलं असून शिवसेनेने यावर आक्षेप घेतला होता. आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीनंतर नव्या सरकारची बहुमत चाचणी घेतली जावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती पण ती मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सोमवारी नव्या सरकारला विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com