'आम्ही सत्तेसाठी कधीही...', एकनाथ शिंदेंच्या ट्वीटमुळे खळबळ

Eknath Shinde
Eknath ShindeSakal

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठा गेम करत शिवसेनेची साथ सोडल्याचं स्पष्ट झालंय. कालपासून ते जवळपास ३५ आमदारांसोबत सुरतला गेले असून शिवसेनेत मोठं बंड समोर आलं आहे. (Eknath Shinde Latest News)

या घडामोडींनंतर राज्यात मोठी राजकीय खळबळ समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय जारी केला. त्यानुसार एकनाथ शिंदे यांची गटनेतापदावरून हकालपट्टी कऱण्यात आली आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांनी निवड झाली आहे. (MLC Election 2022)

कालपासून माध्यमं एकनाथ शिंदे यांच्याची संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्यापर्यंत अद्याप कोणीही पोहोचलेलं नाही. ते नॉट रिचेबल आहेत. अखेर एकनाथ शिंदेंनी ट्वीट करून त्यांचा पुढचा मार्ग स्पष्ट केला आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde LIVE : शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं!

राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. (MLC Election 2022)

याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली. यामध्ये शिंदेंची हकालपट्टी झाल्याचं स्पष्ट झालंय. (Shivsena in MLC Election 2022)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com