
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा प्रमुख नेते म्हणून निवड करण्यात आली. यावेळी पक्षाचे सर्व आमदार, मंत्री आणि नेते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना सांगितले की, माझ्यासाठी पद नाही तर कार्यकर्ते सर्वात महत्वाचे आहेत.