Eknath Shinde : आपल्या सर्वांसाठी आम्ही शिवधनुष्य पेललं; मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

Eknath Shinde
Eknath Shindeesakal

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त जनतेशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सरकारने मागील तीन ते चार महिन्यात राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. तसेच आगामी काळातील प्रकल्पांशी संबंधीत माहिती शिंदे यांनी दिली. (Eknath Shinde news in Marathi)

Eknath Shinde
BJP: हिजाब घालणारी महिला AIMIM प्रमुख कधी होणार? ओवेसींना भाजपचा खोचक सवाल

आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. चांगल्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. विविध योजनांना गती देण्याचा प्रयत्न केला. सरकारला आणखी मजल गाठायची आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राकडे सर्व आशेने पाहात आहेत. आपल्या सर्वांसाठी आम्ही हे शिवधनुष्य पेललं आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, समाजकारण आणि राजकारण यामध्ये समाजकारणाला प्राधान्य द्या. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचितांच्या विकासाचा आमचा ध्यास आहे. हे सरकार प्रत्येकाच्या मनातलं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आमची वाटचाल देखील अशीच सुरू असल्याचही शिंदे म्हणाले.

आपण ज्येष्ठांसाठी मोफत एसटी प्रवास मोफत केला आहे. दिवाळीसाठी सामान्यांना आनंदाचा शिधा दिला. आपत्तीग्रस्तांना भरघोस मदत केली. यामुळे ३० लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. भूविकास बँकेचे कर्ज घेणाऱ्यांना कर्जमाफी दिली. तसेच प्रोत्साहनपर अनुदानही दिल्याचं, शिंदे म्हणाले.

राज्यातील ७५ हजार पदाच्या भरतीची घोषणा झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार आहे. चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरू आहे. समृद्धी महामार्गाचा शुभारंभ लवकरच आपण करणार आहोत, असही शिंदे यांनी म्हटलं. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पोलिस भरती यासाठी प्रयत्नशील असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळविणाऱ्यांना खेळाडूंना मदत करणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com