“तुम्ही गद्दार आहात, डाकूसोबत गेलात…” ; वयोवृद्धाने बच्चू कडूंना भररस्त्यात झापलं! - Bacchu Kadu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu

Bacchu Kadu : “तुम्ही गद्दार आहात, डाकूसोबत गेलात…” ; वयोवृद्धाने बच्चू कडूंना भररस्त्यात झापलं!

उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली म्हणून उस्मानाबाद ( धाराशिव ) मध्ये एक ८० वर्षांच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने आमदार बच्चू कडू यांना जाब विचारला आहे. या वयोवृद्धाने भररस्त्यात बच्चू कडू यांना झापलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी तेथून काढता पाय घेतला. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा त्यांना पाठींबा दिला होता. बच्चू कडू देखील गुवाहाटीला गेले होते. यापूर्वी बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा होता. बच्चू कडू देखील बंड करतील अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना नव्हती. ठाकरे सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. 

दरम्यान एका वयोवृद्धाने झापल्यामुळे बच्चू कडू चर्चेत आले आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "तुम्ही गद्दार आहात, असे का वागला. एका डाकूबरोबर तुम्ही गेलात. जरा नीट वागा, राज्यघटनेच्या चौकटीत वागा", असे म्हणत वयोवृद्धाने बच्चू कडू यांना झापलं आहे. यानंतर घटनास्थळावरून बच्चू कडू यांनी काढता पाय घेतला मात्र त्यांना वयोवृद्धाने जाऊ दिले नाही. गाडीसमोर जावून ते बंडखोरीचा जाब विचारत होते. 


वयोवृद्ध व्यक्ती म्हणाले, “यांचे असं वागणं योग्य नाही. यांनी जनतेबरोबर गद्दारी केली आहे. बच्चू कडूंना ज्या धोरणाने निवडून दिले. ज्या आशेनं निवडून दिले, तसे ते वागत नाहीत. हे सर्व घटनाबाह्य आहे."