

Election officials marking duplicate voters with a double star to ensure fair and transparent municipal elections.
esakal
double star mark for duplicate voters : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज(मंगळवार) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेतली. २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायती निवडणुकीबाबत ही पत्रकारपरिषद झाली. यावेळी विशेष करून दुबार मतदारासंदर्भात निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांनी घेतलेल्या दक्षतेबाबत सविस्तर माहिती दिली गेली.
वाघमारे म्हणाले, ''दुबार आणि तिबार मतदाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने विशेष दक्षता घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टिमवर टुल विकसित केलं आहे आणि या टुलच्या माध्यमातून प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतीमधील प्रभागात संभाव्य दुबार मतदारासमोर डबल स्टार असं चिन्ह आलेलं आहे.''
''जिथे जिथे असं चिन्ह आलेलं आहे, तिथे संबधित मतदार अधिकाऱ्यांकडून संबंधित मतदारास संपर्क साधून तो कोणत्या प्रभागात आणि कोणत्या मतदार केंद्रात मतदान करणार याची माहिती घेतली जाईल. यासोबतच त्याचं नाव, पत्ता, फोटो, लिंग या सर्व बाबी देखील तपासल्या जातील. ज्या मतदान केंद्रात त्याने ऑप्शन दिले असतील, त्या मतदार केंद्रात त्याला मतदानाची सोय असेल. अन्य मतदार केंद्रात त्याला मतदान करता येणार नाही.''
''ज्या मतदाराच्या नावासमोर डबलस्टार आलेला आहे आणि जर त्याने काहीही प्रतिसाद दिलेला नाही. तर त्याची सर्व मतदार केंद्रावर डबलस्टार अशी नोंद होईल. पण असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक हमीपत्र लिहून घेतलं जाईल, की या मतदारकेंद्राव्यतिरिक्त किंवा या मतदानानंतर तो दुसऱ्या मतदार केंद्रावर मतदान करणार नाही. केवळ एकाच मतदार केंद्रावर त्याला मतदान करता येईल.''