निवडणूक आयोगाची काळ्या पैशावर करडी नजर 

निवडणूक आयोगाची काळ्या पैशावर करडी नजर 

मुंबई - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील काळ्या पैशावर करडी नजर ठेवण्यासाठी 112 प्राप्तिकर अधिकाऱ्यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. ते निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, उमेदवारी यांनी केलेल्या खर्चावर नजर ठेवणार आहेत. 

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय कार्यकर्ते, राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, उमेदवार यांच्याकडून खर्च केला जातो. निवडणुकीत खर्चाची मर्यादा असली तरीही निवडणूक जिंकण्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. यासाठी काळा पैसा सर्रास वापरला जातो. अशा घटना सर्रास होतात. हे ध्यानात घेऊन निवडणुका खुल्या, निःपक्ष आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी आयोगाने प्राप्तिकर अधिकाऱ्यांची खर्च निरीक्षक म्हणून तात्पुरती नेमणूक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com