विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी शेतकऱ्याचा अखेर मृत्यू 

हरिभाऊ दिघे 
रविवार, 10 सप्टेंबर 2017

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्या लगतहून गेलेल्या कनोली एकस्प्रेस विद्युत वाहिनीची तार ऊसाच्या शेतात तूटून झालेल्या अपघातात शिंदे वस्तीवरील रमेश लहानू शिंदे ( वय - ५१ ) या शेतकऱ्यास विजेचा जोरदार धक्का बसून गंभीर जखमी होण्याची घटना घडली होती. उपचारादरम्यान  रमेश शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्या लगतहून गेलेल्या कनोली एकस्प्रेस विद्युत वाहिनीची तार ऊसाच्या शेतात तूटून झालेल्या अपघातात शिंदे वस्तीवरील रमेश लहानू शिंदे ( वय - ५१ ) या शेतकऱ्यास विजेचा जोरदार धक्का बसून गंभीर जखमी होण्याची घटना घडली होती. उपचारादरम्यान  रमेश शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 प्रवरा उजव्या कालव्यालगत रमेश शिदे याची शेतजमिन व वस्ती आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे गायीचे दूध डेअरीला घालण्याची तयारी करत असताना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोरील ऊसाच्या शेतात मोठा अवाज झाला. काय झाले हे बघण्यासाठी शिदे यानी त्याठिकाणी धाव घेतली. पाऊस व पाटपाण्याच्या पाझरामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे तुटुन पडलेली विजेची तार त्याच्या नजरेस न पडल्याने शिंदे याना विजेचा जोरदार धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. त्यांचा कबरेपासून खालील पूर्ण भाग भाजला होता. शिदे याच्यांवर लोणी येथिल प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपाचार सुरु होते. उपचारादरम्यान शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी , तीन भाऊ , भावजया , दोन मुली , जावई ,दोन मुले असा परिवार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात आश्वी खुर्द येथे मयत रमेश शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजून किती बळी जाणार ?
मागील चार महिन्यापूर्वी याच वाहिनीवर शेडगाव येथे ठेकेदारीवर काम करणारा सुनिल क्षिरसागर हा काम करताना विजेचा धक्का बसून मृत्यूमुखी पडला होता. त्यानंतर पुन्हा रमेश शिदे या शेतकऱ्याचा बळी गेला. विजेमुळे अजुन किती बळी जाणार ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

Web Title: electric shock Farmer dead in Sangamner esakal news