राज्य अतिथींच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक वाहन; जिटीएस विभागात दोन वाहन | Aditya Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric vehicle
राज्य अतिथींच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक वाहन; जिटीएस विभागात दोन वाहन

राज्य अतिथींच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक वाहन; जिटीएस विभागात दोन वाहन

मुंबई : ग्लोबल वॉर्मिंगचे संकट (Global warming crisis) लक्षात घेता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यात पर्यावरण पूरक नवं इलेक्ट्रिक कार धोरण राबवण्याचा सूतोवाच लावला आहे. त्यानुसार शासकीय परिवहन सेवेतील राज्य अतिथींच्या ताफ्यातही आता इलेक्ट्रिक कार (electric car) धावताना दिसणार आहे. शुक्रवारी दोन इलेक्ट्रिक कारचे उदघाटन मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर (Manisha Mhaiskar) यांच्या हस्ते वरळी येथील शासकीय परिवहन सेवेच्या कार्यालयात पार पडले. (Electric vehicle inauguration by IAS manisha mhaiskar)

हेही वाचा: कोलकाता : नातेवाईकानेच केली तरुणाची गोळ्या झाडून हत्या!

गेल्यावर्षी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहनाच्या वापराबद्दल मोठी घोषणा केली होती. यामध्ये 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये 10 टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रीक वाहनांचा असेल. तर राज्यातील 6 प्रमुख शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या 25 टक्के विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. याशिवाय 7 शहरांमध्ये 2025 पर्यंत 2500 चार्जिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. एप्रिल 2022 पासून राज्यातील सर्व नवीन शासकीय वाहनं ही इलेक्ट्रीक वाहनं असणार असे सांगितले होते.

त्यानुसार आता हळूहळू अमलबाजवणी सुरू करण्यात आली असून शासकीय परिवहन सेवेतील राज्य अतिथींच्या ताफ्यात आणखी इलेक्ट्रिक वाहन दाखल होणार असून, 26 जानेवारी रोजी या वाहनांचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. यावेळी राजशिष्टाचार विभागाच्या मुख्य अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह राजशिष्टाचार विभागाचे संचालक अशोक साळवे, नियंत्रक क्रांती पाटील यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top