Electric Vehicle : वीजेवरील वाहनांना महाराष्ट्राची 'पॉवर'! महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ईव्ही चार्जिंग स्टेशन

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारकडून वीजेवरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.
Electric Vehicle Charging Station
Electric Vehicle Charging Stationsakal

मुंबई - वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारकडून वीजेवरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे देशभरात वीजेवरील वाहनांच्या वापराचे प्रमाण वाढू लागले असले तरी सदरची इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचा विचार करता देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

देशभरात सुमारे विविध उपाययोजना केलगव जात १२ हजार १४६ चार्जिंग स्टेशन असून एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक ३२१६ एवढ्या मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन आहेत. यावरून वीजेवरील वाहनांना महाराष्ट्राची पॉवर असल्याचे स्पष्ट होत आहे.

देशात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात जवळपास २८ कोटी वाहने असून ती पेट्रोल- डिझेलवर धावतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन होत असल्याने हवेचे प्रदूषण होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे.

मात्र सदरची वाहने चार्ज करण्यासाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारणे आवश्यक आहे. त्यामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर असून ३ हजार २१६ चार्जिंग स्टेशन असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत १८८६, कर्नाटकात १०४१ चार्जिंग स्टेशन्स आहेत, तर इतर राज्यांमध्ये सदरचा आकडा तीनशे-चारशे एवढा कमी आहे.

महामार्गाबरोबरच शहरात उभारणी

महाराष्ट्रात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढावी, त्यांना अखंडित वीज पुरवठा केला जावा म्हणून राज्य सरकारने महावितरणला नोडल एजन्सी म्हणूम नेमले असून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन उभारली जात आहे. राज्यात सध्या महामार्गावर, प्रमुख शहरात आणि हौसिंग सोसायटीमध्ये चार्जिंग स्टेशन उभारली आहे.

विविध राज्यातील चार्जिंग स्टेशन

महाराष्ट्र - ३२१६

दिल्ली - १८८६

कर्नाटक - १०४१

केरळ - ८५२

तामिळनाडू - ६४३

उत्तर प्रदेश - ५८२

राजस्थान - ५००

तेलंगणा ४८१

गुजरात - ४७६

मध्य प्रदेश - ३४१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com